You are currently viewing कुर्‍हाड बंदी असताना दोडामार्ग, सावंतवाडीत १६ हजार झाडांची कत्तल…

कुर्‍हाड बंदी असताना दोडामार्ग, सावंतवाडीत १६ हजार झाडांची कत्तल…

माहितीच्या अधिकारात उघड; दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करणार – जयंत बरेगार

सावंतवाडी

दोडामार्ग आणि सावंतवाडीत कुर्‍हाड बंदी असताना तब्बल १६ हजार झाडांची खुलेआम कत्तल झाल्याचा प्रकार माहीती अधिकारात उघड झाला आहे.विशेष म्हणजे अशी प्रकरण पुढे आल्यानंतर संबधितांवर थेट गुन्हा दाखल करणे,कींवा मोठा दंड ठोठावणे गरजेचे होते. परंतू तेथिल अधिकार्‍यांनी कीरकोळ दंड आकारला आहे. तर दुसरीकडे ते लाकुड त्याच ठीकाणी जाळले,असे खोटे पंचनामे दाखवून बोगस पासाच्या माध्यमातून या लाकडांची वाहतूक केली आहे.असा आरोप माहीती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक देवून याबाबतची माहीती पुरावानुसार दिली असून या प्रकरणात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात आपण वरिष्ठ स्तरावर दाद मागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत सावंतवाडी वनविभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण १२६ विनापरवाना वृक्षतोडीची प्रकरणे घडलेली आहेत. त्यापैकी केवळ ७४ प्रकरणे पुरविण्यात आलेली असून त्यातील २९ विनापरवाना वृक्षतोडीची प्रकरणे मुंबई हायकोर्टाने सावंतवाडी तालुक्यामधील वृक्षतोडीस बंदी घातलेल्या २५ गावांमध्ये झाली आहेत. यामध्ये सुमारे २ हजार ७५९ झाडांची कत्तल झाली आहे तर उर्वरित ४५ विनापरवाना प्रकरणात सुमारे तीन हजार पाचशे झाडांची कत्तल झाली आहे अशी एकूण ७४ विनापरवाना वृक्षतोड मध्ये ६ हजार २५९ झाडांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तर दोडामार्ग तालुक्यात एकूण ४६ प्रकरणे झाली असून प्रत्यक्षात २३ प्रकरणे माहितीच्या अधिकारात पुरविण्यात आली आहेत. पुरविलेल्या २३ प्रकरणांचे अवलोकन करता सुमारे १० हजार झाडांची कत्तल झालेली आहे. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकारी तथा वृक्षतोड अधिकारी दोडामार्ग यांनी मुंबई हायकोर्टाच्या वृक्षतोड बंदीचे गांभीर्य न घेता विनापरवाना वृक्षतोडीवर जबर दंड करणे तोडीला वापरलेली हत्यारे वाहने तोड करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही.विशेष म्हणजे सदर चा विनापरवाना तोडीचा माल जप्त करून तो सरकार जमा करणे व संबंधितांनी मुंबई हायकोर्टाच्या आदेशाच्या हवामान केल्याने त्यांच्यावर मुंबई हायकोर्टाच्या आदेशाच्या गुन्हा दाखल करणेबाबत हायकोर्टाला कळविणे हे वनअधिकाऱ्यांचे शासकीय कर्तव्य होते.असे असताना त्यांनी संबंधितांना किरकोळ दंड केल्याचे समोर आले आहे.तर या प्रकरणात कोणतीही वाहने जप्त केले नाहीत वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीवर वाहनांवर गुन्हा दाखल केलेला नाही बहुतेक प्रकरणांमध्ये लाकूड माफियांना शेतकरी भासवून केलेली प्रचंड वृक्षतोड जागेवर जाऊन टाकल्याचा जबाब दिला आहे. सदर जबाबास अनुसरून वृक्षतोड अधिकारी यांनी किरकोळ दंडात्मक कारवाई अनधिकारी केलेली असल्याचेही निदर्शनास येत आहे. वास्तविक संबंधितावर बायोडायव्हर्सिटी ऍक्‍टनुसार कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकारच घडला असावा वयात अर्थपूर्ण तडजोड झाली असावी असा संशयही सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी व्यक्त केला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
FacebookTwitterWhatsAppShare

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =