You are currently viewing रविवारी सायंकाळी बंदुकीचा छर्रा लागून तळवडे येथील एक जखमी

रविवारी सायंकाळी बंदुकीचा छर्रा लागून तळवडे येथील एक जखमी

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सावंतवाडी

बंदुकीने फायर केलेला छर्रा पाठीत लागून तळवडे म्हाळाईवाडी येथील मोहन भिवा मालवणकर (52) हे जखमी झाले. हा प्रकार रविवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी शेजारील अंकुश सिताराम लोके (24) याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी मालवणकर हे घराकडे पायी चालत येत असताना अचानक त्यांच्या पाठीत काहीतरी आदळल्याचे जाणवले यावेळी ते मोठ्याने ओरडल्याने त्या ठिकाणी अंकुश लोके यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती धावत आले. अंकुश लोके यांच्या हातात यावेळी एरगन होती. त्यांनी मालवणकर यांना घरी घेऊन जात उजेडात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या पाठीत खालील भागास एरगनीचा छर्रा लागल्याचे दिसून आले. आपण माकडांवर फायर केलेला छर्रा झाडावर आदळून तुम्हाला लागला असावा असे यावेळी लोके यांनी सांगितले. यावेळी त्याना फारसा त्रास होत नसल्याने घरीच उपचार करुन ते झोपले. मात्र सकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना नातेवाईकांनी उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र छर्रा आतमध्ये असल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता गोवा बांबुळी येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
दरम्यान येथील पोलिस ठाण्यात मालवणकर याचा मुलगा महेश मालवणकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार हयगईने व अविचाराने एरगनीचा छर्रा फायर करुन दुसर्याच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अंकुश लोके याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा