You are currently viewing भरीव नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल मच्छिमार नेत्यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार

भरीव नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल मच्छिमार नेत्यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार

तौकते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव मदत मिळवून दिल्याबद्दल मालवण येथील मच्छिमार नेत्यांनी आमदार वैभव नाईक यांची आज कणकवली विजय भवन येथे भेट घेऊन मच्छीमारांच्या वतीने त्यांचे आभार मानले. याआधी कधीही न मिळालेली मोठ्या स्वरूपातील नुकसान भरपाई जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेही मच्छिमार नेत्यांनी आभार मानले.
तसेच १ ऑगस्ट पासून मच्छिमारी हंगाम सुरु होत असून पारंपारिक मच्छिमार व एलईडी लाईटद्वारे मच्छिमारी करणारे मच्छीमार यांच्यात असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,मत्स्यविभागाचे अधिकारी,जिल्ह्यातील तहसीलदार यांची संयुक्त बैठक आयोजित करून मच्छिमारांचे प्रश्न सोडवण्याची व उपाययोजना करण्याची मागणी केली. आ. वैभव नाईक यांनी लवकरच हि बैठक घेण्याची ग्वाही दिली.
यावेळी श्रमिक मच्छिमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी,मच्छीमार नेते अन्वय प्रभू सन्मेष परब, राका रोगे,नितीन लोणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा