You are currently viewing राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची उद्या १०० वी पुण्यतिथी…

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची उद्या १०० वी पुण्यतिथी…

शहरवासीयांनी सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळावी ; मालवण पालिकेचे आवाहन…

मालवण

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी सकाळी १०० पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. तरी शहरवासीयांनी आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी १०० सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहावी. यासाठी येथील पालिकेच्या वतीने सकाळी १० वाजता एकदा भोंगा वाजविण्यात येणार आहे. त्यावेळी सर्व नागरिकांनी १०० सेकंद स्तब्ध राहायचे आहे. १०० सेकंदानंतर पुन्हा दोन वेळा भोंगा वाजविण्यात येईल. अशा अनोख्या पद्धतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा