You are currently viewing सावंतवाडीतील श्री.एकमुखी दत्तमंदिर व प.प.श्री. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिर येथे गुरुवारी ३० जूनला होणार श्री.टेंबे स्वामी पुण्यतिथी उत्सव सोहळा.

सावंतवाडीतील श्री.एकमुखी दत्तमंदिर व प.प.श्री. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिर येथे गुरुवारी ३० जूनला होणार श्री.टेंबे स्वामी पुण्यतिथी उत्सव सोहळा.

सावंतवाडी

सावंतवाडी, सबनिसवाडा येथील श्री.एकमुखी दत्तमंदिर व प.प. श्री.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिर येथे उद्या गुरूवार दिनांक ३० जून २०२२ रोजी प.प.टेंबे स्वामी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.
सकाळी आठ वाजता प.प. टेंबे स्वामी महाराज यांच्या पादुकांवर महाअभिषेक पूजा करण्यात येणार आहे. दुपारी ठीक १२.०० वाजता आरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३.०० वाजल्यापासून ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत नामस्मरण व ठीक ७.३० वाजता आरती होणार आहे. आरती नंतर पालखी सोहळा होणार असून रात्री भजनादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व दत्तभक्त, स्वामीभक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा