You are currently viewing उद्योजकांना कमी व्याजदरात तातडीने कर्जपुरवठा ; युको बँकेची ग्वाही

उद्योजकांना कमी व्याजदरात तातडीने कर्जपुरवठा ; युको बँकेची ग्वाही

उद्योजकांना कमी व्याजदरात तातडीने कर्जपुरवठा ; युको बँकेची ग्वाही

‘उद्योगवृद्धी वार्तालाप’ कार्यक्रमात पर्यटन व शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्याचा निर्धार

कुडाळ :

“नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना तसेच विद्यमान उद्योगांचा विस्तार करू पाहणाऱ्या सर्वांनाच युको बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरात आणि तातडीने कर्जपुरवठा करण्याचा आमचा मानस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी युको बँक पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन युको बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर यांनी केले.

कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उद्योगवृद्धी वार्तालाप’ कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ‘गाव तेथे उद्योजक’ संकल्पनेचे मुख्य समन्वयक यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश आणि उद्योजकांसाठी उपलब्ध संधी यावर प्रकाश टाकला. युको बँकेच्या पणजी शाखेचे मुख्य प्रबंधक यांनी बँकेच्या विविध कर्ज योजनांची तसेच उद्योगांना उपलब्ध होणाऱ्या अर्थसाहाय्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित उद्योजकांनी आपल्या अडचणी मांडत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

हेडिंग :

उद्योजकांना कमी व्याजदरात तातडीने कर्जपुरवठा ; युको बँकेची ग्वाही

सबहेडिंग :

‘उद्योगवृद्धी वार्तालाप’ कार्यक्रमात पर्यटन व शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्याचा निर्धार

कुडाळ : “नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना तसेच विद्यमान उद्योगांचा विस्तार करू पाहणाऱ्या सर्वांनाच युको बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरात आणि तातडीने कर्जपुरवठा करण्याचा आमचा मानस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी युको बँक पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन युको बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर यांनी केले.

कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उद्योगवृद्धी वार्तालाप’ कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ‘गाव तेथे उद्योजक’ संकल्पनेचे मुख्य समन्वयक यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश आणि उद्योजकांसाठी उपलब्ध संधी यावर प्रकाश टाकला. युको बँकेच्या पणजी शाखेचे मुख्य प्रबंधक यांनी बँकेच्या विविध कर्ज योजनांची तसेच उद्योगांना उपलब्ध होणाऱ्या अर्थसाहाय्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित उद्योजकांनी आपल्या अडचणी मांडत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

या प्रसंगी कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे नितीन पावसकर, निलेश धडाम, कुणाल ओरसकर, आनंद बांदिवडेकर, किशनलाल बिश्नोई, सौ. अमृता कदम तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राजन नाईक, इंडिया बांबू फोरमचे शिल्पेश गंभीरे, उद्योजक सुरज तेंडुलकर, पी.के. परब, साईश मसके, गौरव पाटकर, भिवा परब, राहुल मानकर आदी उद्योजक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पब्लिक रिलेशन, प्रसारमाध्यमं आणि कम्युनिकेशन समितीचे को-चेअरमन ॲड. नकुल पार्सॅकर यांनी युको बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा