You are currently viewing कट्टा येथे दिलीप गुराम यांच्याकडून वैद्यकीय मदत!

कट्टा येथे दिलीप गुराम यांच्याकडून वैद्यकीय मदत!

मालवण / कट्टा:

 

कै.भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री.दिलीप रामचंद्र गुराम यांनी ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रथमोपचारासाठी लागणारे साहित्य व औषधे तीनही आशा स्वयंसेविकाना दिले. तसेच ग्रा.प.सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सर्व ग्रा.प. कर्मचारी, सर्व आशा यांना गुलाब पुष्प देऊन छत्री, पेढे, लक्ष्मीची प्रतिमा भेट म्हणून दिली. श्रीम.राजश्री राजेश गुराम यांना त्यांनी त्यांच्या मुलासाठी शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. यावेळी ग्रा.प.सदस्य श्री.बाबू टेंबुलकर, श्री.वंदेश ढोलम, सौ.मयूरी कुबल, सौ.श्रद्धा संजय गुराम, सौ.सुप्रिया संदिप गुराम, सौ.संपदा अमोल वालावलकर, सौ.विद्या गिरकर, ग्रामसेवक श्री. सरमळकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सुनिल गुराम, ग्रा.प.कर्मचारी श्री.श्रीकांत भोजणे, सौ.सोनाली भोजणे, श्री.संकेत परुळेकर, श्री.महादेव गोठणकर, आशा सौ.मृण्मयी ढोलम, आशा श्रीम.अनुष्का गुराम, आशा सौ.पाडावे, श्री.बाळू हंजणकर, श्री.दादा रावले उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा