You are currently viewing सर्वसामान्यांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा देणार

सर्वसामान्यांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा देणार

माणुसकी फौंडेशन – केअर हॉस्पिटलचा निर्णय ; माहितीपत्रकाचा शुभारंभ

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहर परिसरात सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या माणुसकी फौंडेशन आणि सेवावृत्तीने वैद्यकिय क्षेत्रात सेवारत असलेल्या केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने कोणीही गोरगरीब, सर्वसामान्य रुग्ण वैद्यकिय उपचारापासून वंचित राहू नये यासाठी लहान मुलांवर मोफत उपचार, खर्चिक उपचारांसाठी बिनव्याजी कर्ज, मोफत शस्त्रक्रिया आदी उपचार सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या सेवेच्या माहितीपत्रकाचा शुभारंभ पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला

मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून माणुसकी फौंडेशनच्या माध्यमातून निराधार व गरीब ,गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी मदत करणे , विविध स्वरुपात मदत उपलब्ध करुन देणे यासह शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे.यासाठी केअर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे देखील मोठे योगदान मिळत आहे.या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील
गोरगरीब, सर्वसामान्य रुग्ण वैद्यकिय उपचारापासून वंचित राहू नये यासाठी लहान मुलांवर मोफत उपचार, खर्चिक उपचारांसाठी बिनव्याजी कर्ज, मोफत शस्त्रक्रिया आदी उपचार सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या सेवेच्या माहितीपत्रकाचा शुभारंभ पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी पोलिस उपअधिक्षक महामुनी यांनी विविध आजारांवरील उपचारासाठी शासकीय मदतीचा लाभ न मिळणार्‍या सर्वसामान्य रुग्णांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यासह अत्यल्प दरात उपचार देण्याचा केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माणुसकी फौंडेशन यांनी घेतलेला निर्णय निश्‍चितपणे कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे पैसे नाहीत म्हणून कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, असे गौौरवोद्गार काढले.
माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवि जावळे यांनी,
केअर हॉस्पिटलने माणुसकी फौंडेशनला सोबत घेऊन अत्यल्प दरात उपचार तसेच खर्चिक उपचारासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलसोबत आम्ही आणखीन चांगले काम करून उपचाराविना कोणीच राहणार नाही यावर लक्ष केंद्रीत करु असे सांगितले.
योजनासंबंधी माहिती देताना केअर हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप पाटील यांनी, पैशाअभावी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येणे अशक्य असल्याने अनेक रुग्णांनी उपचाराविना प्राण गमावले आहे. मात्र आता पैसे नाहीत म्हणून कोणीही उपचाराविना राहणार नाही आणि कोणालाही प्राण गमवावा लागणार नाही असा संकल्प माणुसकी फौंडेशन व केअर हॉस्पिटल यांनी केला आहे.तसेच
ज्या रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही अशा रुग्णांना उपचार खर्चासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ, माणुसकी फौंडेशनचे कार्यकर्ते , नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 8 =