You are currently viewing हुमरमळा येथे कार अपघातात चार जखमी..

हुमरमळा येथे कार अपघातात चार जखमी..

कुडाळ 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हुमरमळा येथे बस स्टॉपला कार आदळल्याने रविवारी दुपारी अपघात झाला या अपघातात चालक जखमी झाला असून कारमधील इतर चार व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत. तरी या कारमध्ये असलेले सहा महिन्याचे बाळ सुखरूप असल्याची माहिती घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दिली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  गोव्याहून पुण्याकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाच्या समोर हुमरमळा बसस्टॉप येथे अचानक सायकलवाला आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी हुमरमळा बस स्टॉप वर आदळल्याने गाडी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 1 =