You are currently viewing हळवल फाट्यावर धावत्या ज्युपिटरला अचानक आग

हळवल फाट्यावर धावत्या ज्युपिटरला अचानक आग

हळवल फाट्यावर धावत्या ज्युपिटरला अचानक आग

काही क्षणांत दुचाकी जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

कणकवली :

कणकवली – हळवल फाटा येथे वागदेच्या दिशेने जाणाऱ्या ज्युपिटर दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. भर रस्त्यात दुचाकीमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी रस्त्यावरून जात असताना अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. चालकाने तत्काळ दुचाकी बाजूला घेतली. मात्र, काही क्षणांतच आगीने संपूर्ण दुचाकीला वेढले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा