You are currently viewing नरडवे रोडवर ज्येष्ठ नागरिक जीवासाठी झुंजतोय; मदतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन

नरडवे रोडवर ज्येष्ठ नागरिक जीवासाठी झुंजतोय; मदतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन

नरडवे रोडवर ज्येष्ठ नागरिक जीवासाठी झुंजतोय; मदतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन

१० दिवसांपासून गंभीर स्थिती; पोलिसांना माहिती, नागरिकांनी पुढे येण्याची गरज

कणकवली

नरडवे रोड परिसरात एक अनोळखी ज्येष्ठ नागरिक अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आला असून तो सध्या जीवाच्या आकांताने झुंज देत आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्याची अवस्था चिंताजनक असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू कासले यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पाहणी करण्यात आली असता संबंधित ज्येष्ठ नागरिक अत्यंत धोकादायक (डेंजर) स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिस प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना पुढे येऊन या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. तातडीने वैद्यकीय उपचार आणि आवश्यक सहाय्य मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा