You are currently viewing जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम संपन्न….

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम संपन्न….

सावंतवाडी

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेत शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. यात प्रशालेच्या माजी शिक्षिका कै. सौ. शशिकला शिरगावकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या डॉ. नेहा शेठ यांनी रु.५ हजार रक्कमेची शिष्यवृत्ती प्रशालेतील प्रत्येकी तीन अभ्यासू विद्यार्थिनींसाठी तसेच दिनेश पांगम यांनी त्यांच्या कन्या रोहिणी दिनेश पांगम हिच्या स्मरणार्थ चित्रकला ग्रेड परीक्षेत अव्वल कामगिरी केलेल्या एका विद्यार्थिनीला २ हजार रक्कम शिष्यवृती प्रदान केली. सदर शिष्यवृती धारक विद्यार्थिनी: कै. सौ. शशिकला शिरगावकर शिष्यवृती दुर्वा राकेश बांदेकर (सातवी), स्नेहा शशिकांत सावंत (नववी), मृण्मयी गुरुनाथ सावंत(नववी), कै. रोहिणी दिनेश पांगम शिष्यवृतीसाठी सुहानी अंकुश नाईक (दहावी) यांना सदर शिष्यवृती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या माजी शिक्षिका श्रीमती नाईक यांनी सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजने अंतर्गत दोन विद्यार्थिनिंना शिष्यवृती जाहीर केली. सदर कार्यक्रमास उपस्थित डॉ. प्रसाद नार्वेकर, गोठसकर, वझे, नाईक , मानकर, पाटील शिक्षक वर्ग, पालक वर्ग, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वानी शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बांदेलकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा