शिवसेनेच्या माजगांव युवासेना विभागप्रमुखपदी अतुल कासार

शिवसेनेच्या माजगांव युवासेना विभागप्रमुखपदी अतुल कासार

सावंतवाडी

माजगांव युवासेना विभागप्रमुखपदी अतुल कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याहस्ते अतुल कासार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख योगेश नाईक, सरपंच दिनेश सावंत, उपसरपंच संजय कानसे, माजी उपसभापती चंद्रकांत कासार, माजी सरपंच आबा सावंत, विभाग प्रमुख संजय माजगांवकर, शिवसेना शाखाप्रमुख रुपेश नाटेकर , नरहर शिरोडकर, रसिका हरमलकर, गोपिका धुरी, हेलन निब्रे, राजन पाटकर, रुद्राजी भालेकर, रीचर्ड डिमिलो, शिवराज परब आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा