मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी जे. पी. जाधव रुजु

मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी जे. पी. जाधव रुजु

मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्‍यांनी केले स्वागत

मालवण
मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी जे. पी. जाधव हे रुजु झाले.जे. पी. जाधव यांची मालवण तालुका मनसेच्यावतीने तालुकाध्यक्ष विनोद सांडव व उपतालुकाध्यक्ष उदय गावडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी सदिच्छा भेट घेत स्वागत केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून राजेंद्र पराडकर यांच्याकडे प्रभारी पदभार होता. ते सध्या जिल्हा परिषदेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव,मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, उपतालुकाध्यक्ष उदय गावडे, उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, गुरु तोडणकर, विशाल माडये, राजेश परब, साईराज चव्हाण, दत्तराज चव्हाण, नंदकिशोर गावडे, विनीत कांदळगांवकर, विजय गावडे, सिद्धेश मयेकर, संदीप मुणगेकर, हरेश भिसळे, प्रसाद बापर्डेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा