You are currently viewing मालवण तालुक्यातील बांदिवडे पुलाच्या पलीकडे जुगाराची बैठक

मालवण तालुक्यातील बांदिवडे पुलाच्या पलीकडे जुगाराची बैठक

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगाराच्या बैठकांनी जोर धरला असून अनेक गावांमध्ये अवैद्य जुगार धंद्यामुळे तरुणाई मात्र बिघडण्याच्या मार्गावर चालली आहे. मालवण तालुक्यातील बांदिवडे पुलाच्या पलीकडे डाव्या बाजूला नदीच्या किनारी ‘स’येकर नामक जुगाऱ्याची मैफिल धुमधडाक्यात सुरू झाली असून त्याच्या साथीला तक्षिमदार म्हणून कणकवली येथील जुगारी पानवाला ‘न’ळी असून या मैफिलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठमोठे जुगारी त्याचप्रमाणे गोव्यातील खेळी देखील सायंकाळी बांदिवडे येथे येण्यासाठी रवाना झाले होते. बांदिवडे हे गाव गड नदीच्या किनाऱ्यावर असल्याने मुख्य हमरस्त्यापासून बरेचसे आत मध्ये आहे. त्यामुळे जुगार्यांना बांदीवडे नदी किनाऱ्याच्या आसपास जुगाराच्या मैफिली बसविण्यासाठी सुरक्षित अशी जागा मिळते. बऱ्याचदा बांदीवडे पुलाच्या पलीकडे जुगाराच्या मैफिली रंगतात आणि एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल या जुगाराच्या मैफिलींमधून होत असते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांमध्ये अशा प्रकारे जुगाराच्या अवैद्य बैठका बसत असल्याने गावातील तरुण पिढी आणि कष्टकरी लोक या जुगाराच्या नादापायी होत्याचे नव्हते करून बसतात. त्यामुळे अनेक कुटुंबावर बऱ्याचदा उपासमारीची वेळ सुद्धा येते. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मालवण तालुक्यातील बांदिवडे येथे बसत असलेल्या जुगाराच्या मैफिलींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा