पालकमंत्री नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर;
ओमगणेश निवासस्थानी जनतेच्या गाठीभेटी
कणकवली :
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे रविवार, १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यात नियोजित असलेल्या विविध शासकीय, सामाजिक व विकासात्मक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्यादरम्यान पालकमंत्री नितेश राणे हे कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी जनतेच्या गाठीभेटी घेणार असून, नागरिकांच्या विविध समस्या, मागण्या व सूचना जाणून घेणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्याबरोबरच नियोजित कार्यक्रमांमधून विकासकामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दौऱ्यामुळे जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
