You are currently viewing क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त अभिवादन

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त अभिवादन

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त अभिवादन

सिंधुदुर्गनगरी

सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालय येथे  इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर व सहाय्यक आयुक्तसमाज  कल्याण यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

              या कार्यक्रमाचे मान्यवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष तथा अप्पर  जिल्हाधिकारी डॉ. ज्योत्सना पडीयार,यांच्या उपस्थितीत महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्पहार व दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधवजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी  सचिन साळेप्रमुख वक्ते प्राध्यापक नागेश कदमसमाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त  संतोष चिकणे व बोधीसत्व चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे तसेच शाहीर प्रबोधनकार जनीकुमार कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा समितीचे अध्यक्ष नाना नेरूळकरसामाजिक कार्यकर्ते नामदेव मठकरअरूणा प्रकल्प लढा संघर्षाचा अरूणा प्रकल्प ग्रस्तांच्या अस्त्विाचा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सावंत आदी उपस्थित होते. मान्यवरांना कार्यालयामार्फत पुस्तक भेट देवून स्वागत करण्यात आले.

             प्रमुख वक्ते नागेश कदम यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जीवन व विचारांवर उपस्थित नागरिकमहाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांना प्रबोधन करून मार्गदर्शन केले. डॉ.ज्योत्सना पडीयार, प्रमोद जाधव यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यबाबत माहिती सांगितली.  तसेच महात्मा फुले यांच्या जीवनावर शाहीर प्रबोधनकार जनीकुमार कांबळे पोवाडा गायन केले. 

              सामाजिक न्याय पर्वनिमित्त जिल्ह्यातील महाविद्यालये व शासकीय वसतिगृहे, आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या निंबध स्पर्धा व चित्रकला स्पर्धतील विजेत्यांना मान्यवराच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन आनंद कर्पे यांनी केले. आभार समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकविद्यार्थीसामाजिक कार्यकर्ते व अधिकारी – कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा