You are currently viewing परुळेतील प्लास्टिक व्यवस्थापन युनिट प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

परुळेतील प्लास्टिक व्यवस्थापन युनिट प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध सामूहिक जागृती करण्यासाठी तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन युनिट प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला. डिस्पोझेबल आणि सिंगल-युज प्लास्टिक वाढत्या उत्पादनामुळे प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण ही एक चिंताजनक बाब आहे, ते कमी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे पाऊल उचलल्याबद्दल परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले.

वेंगुले तालुक्यातील हा पहिला प्लॅस्टीक वर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. जो परूळेबाजार ग्रा.पं. ने पूर्ण केला आहे. या उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, तहसिलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी पुनम राणे, भारतीय जनता पक्षाचे प्रभाकर सावंत, बाळू देसाई, माजी सभापती निलेश सामंत, सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभु, अभय परुळेकर, तन्वी दुधवडकर, सीमा सावंत, प्राजक्ता पाटकर,पुनम परुळेकर नमिता परुळेकर, ग्रामसेवक शरद शिंदे, स्वच्छता विभागाचे निलेश मठकर, जनजीवन मिशनचे श्री टिपणीस,उपअभियंता शिंदे यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रा.पं. परुळे बाजार यांजकडून उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री यांनीयावेळी तालुक्यातील पहिला घनकचरा प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल व ग्रा.पं. तीने अभियानातील यशाबद्दल ग्रा. पं चे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + six =