You are currently viewing *जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार “रामभरोसे” ;  रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल

*जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार “रामभरोसे” ; रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल

रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल

गैरसोय दूर न झाल्यास 1 मे रोजी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक प्रसाद गावडे यांचा इशारा

सिंधुदुर्ग :

जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार महत्त्वाची वरिष्ठ पदे रिक्त असल्याने मंदावल्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे निवासी उपजिल्हाधिकारी, कुडाळ व सावंतवाडी प्रांत ही महत्त्वाची पदे पुष्कळ कालावधी उलटून देखील रिक्त असल्याने शासकीय यंत्रणा देखील हतबल झाली आहे.वास्तविक एप्रिल व मे महिना शालेय सुट्ट्यांचा कालावधी असल्याने चाकरमानी आपल्या वडिलोपार्जित जमिनीच्या कामकाजासाठी महसूल दफ्तरी ये जा करत आहेत.मात्र सक्षम अधिकारीच नसल्याने नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. प्रभारी पदभार असलेल्या अधिकाऱ्यांकडून कामचलावू कामकाज चालू असल्याने नागरिकांची कामे विहित वेळेत होत नाहीत अशा तक्रारी प्राप्त होत आहेत.महसूल यंत्रणेतील महत्वाची पदे अनेक दिवस रिक्त असल्याने जिल्ह्याला कुणी वाली उरला आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या दयनीय परिस्थितीकडे डोळसपणे लक्ष वेधून वरीष्ठ पातळीवर तात्काळ अधिकारी नियुक्तीसाठी पाठपुरावा करून प्रशासकीय यंत्रणेची होणारी गैरसोय दूर करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा 1 मे रोजी नागरी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =