You are currently viewing बांदा किल्याची सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे साफसफाई…

बांदा किल्याची सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे साफसफाई…

बांदा किल्याची सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे साफसफाई…

बांदा
सोळाव्या शतकातील इतिहासाची साक्ष देणाऱ्या बांदा पोलीस ठाणे येथील बांदा किल्ल्याची साफसफाई मोहीम आज सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आली. आज दिवसभर कित्येक टन कचरा गोळा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात किल्ल्याच्या परिसरात वाढलेल्या जंगली झाडाझुडपाची तोड करण्यात आली. किल्ल्याची संवर्धन मोहीम राबविण्यात आल्याने या ऐतिहासिक वास्तूला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे.
आज सकाळीच सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत या किल्ल्याची संवर्धन मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या संवर्धन मोहिमेत किल्ल्यातील परिसर पूर्णपणे साफसफाई करण्यात आला.
या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठानचे सिया गावकर, अश्विनी घाडीगांवकर, कविता म्हापसेकर, सुनिल राऊळ, एकनाथ गुरव, प्रताप परब, वसंत तावडे, ओवी आरोसकर, अजय आरोसकर, औदुंबर परब, हरी आमडोसकर, साहील आईर, बंटी आईर, महादेव धुरी, समीर आईर आदींनी सहभाग घेतला. यावेळी साफसफाई मोहीम राबविणाऱ्या मावळ्यांचा बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, बांद्याचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस जावेद खतीब, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. मोहिमेत सहभागी झालेल्याना बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा