You are currently viewing बांद्यातील विवाहित महिलांसाठीच्या वेशभूषा स्पर्धेत भक्ती आळवे प्रथम…

बांद्यातील विवाहित महिलांसाठीच्या वेशभूषा स्पर्धेत भक्ती आळवे प्रथम…

बांदा

येथील श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ व नट वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महीला दिनाचे औचित्य साधुन खास विवाहीत महीलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वेशभुषा स्पर्धेत सौ भक्ती आळवे यानी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत सौ श्वेता कोरगावकर यांनी द्वितीय क्रमांक, सौ स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावीला. अनुजा महाजन, रिना मोरजकर, विनीता गोसावी, वर्षा नाडकर्णी, सरोज नाईक यांना उत्तेजनार्थ पारीतोषीक देण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, डॉ. सोनल लेले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी गणेश ठाकुर, वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, संचालक निलेश मोरजकर, सौ सरोज नाईक, बांदा माजी सरपंच प्रियांका नाईक, कार्यवाह राकेश केसरकर श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या विश्वस्ता सौ दर्शना केसरकर, सौ राजश्री तेंडले, सौ प्रियांका हरमलकर, बांदा नट वाचनालयाच्या महीला संचालिका सौ स्वप्निता सावंत मान्यवर म्हणुन उपस्थित होत्या. यावेळी बांदा केंद्रशाळेच्या शिष्यवृत्तीतील गुणवंत विद्यार्थिनी किमया परब, कनिष्का केणी यांचा सत्कार करण्यात आला.
पुंडलिक दळवी म्हणाले, नट वाचनालय व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाने महीलांसाठी हि स्पर्धा आयोजीत‌ करून महीलांना व्यासपीठ देऊन त्यांच्या सुप्त गुणाना, कलेला वाव मिळवून दिला हे कौतुकास्पद आहे. डॉ. सोनल लेले म्हणाल्या, केवळ चूल आणि मूल यामध्ये न अडकता महिलांनी अशा कार्यक्रमातून, स्पर्धांमधून आपली कला सादर करावी. या स्पर्धेत वयाची सत्तरी पार केलेल्या महिलांनी देखील उस्फूर्तपणे सहभाग घेतला हेच या स्पर्धेचे यश आहे. डॉ. लेले व गणेश ठाकुर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष व‌ बांदा नट वाचनालयाचे सचीव राकेश‌ केसरकर यांनी केले. सुत्रसंचालन व आभार शिक्षक जे. डी. पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा