You are currently viewing संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन*

रक्तदान शिबिर,विद्यार्थ्यांचा सत्कार,आशा सेविकांचा होणार सत्कार

कणकवली

शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश पारकर मित्रमंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम गेले 25 वर्षे सातत्याने केले जात आहेत. या वर्षीही विविध कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले.14 जुलैला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे.
रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली कॉलेजच्या हॉलमध्ये” सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे.तसेच या रक्तदान शिबिरासाठी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर,शहर प्रमुख उमेश वाळके, शहर प्रमुख प्रदीप मसूकर ,सुजित जाधव,उत्तम लोके, वैभव मालंडकर,सोहम वाळके यांनी केले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने 10 वी ,12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजत संपन्न होणार आहे.

आशा सेविकांचा होणार सत्कार

छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये जिथे प्रशासन पोचू शकत नाही.अशा ठिकाणी आशा सेविका जाऊन आपली सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवत असतात.आशा सेविकांचा सत्कार शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कणकवली शहरातील बचत गटांना “छत्री ” वाटप करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम सोहळा “कणकवली भगवती मंगल कार्यालय सकाळी 11 वाजता “करण्यात येणार आहे .या सत्कार सोहळ्यासाठी कणकवली तालुक्यातील आशा सेविकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महिला शिवसेना जिल्हाप्रमुख नीलम पालव , महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, महिला शहर प्रमुख साक्षी आमडोस्कर ,दिव्या साळगावकर यांनी केले आहे.

दिव्यांगाना करणार” छत्री” वाटप

वाढदिवसानिमित्त विशेष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगनां ” छत्री” वाटप करण्यात येणार आहे.” कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.”तरी जिल्ह्यातील दिव्यांगण बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली शिवसेनेचे तालुका प्रमुख शैलेश भोगले, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत,यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 12 =