वैभववाडी सांगुळवाडी कोवीड सेंटरमधील रुग्णांना गावठी अंडी वाटप

वैभववाडी सांगुळवाडी कोवीड सेंटरमधील रुग्णांना गावठी अंडी वाटप

आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका भाजपा व माजी नगरसेवक संताजी रावराणे यांचे आयोजन

वैभववाडी
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सांगुळवाडी येथील कोवीड सेंटर मधील रुग्णांना गावठी अंडी व मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, माजी नगरसेवक संताजी रावराणे, प्राची तावडे, आशिष रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. संताजी रावराणे पुरस्कृत रुग्णांना गावठी अंडी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच सर्व रुग्णांना मास्कचे वाटप करण्यात आले.

जवळपास 150 गावठी अंडी डॉ. राजेंद्र पाताडे यांच्याकडे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सुफुर्द केली. कोवीड महामारीत रुग्णांना सहकार्य करणाऱ्या पदाधिकार्‍यांचे डॉ. पाताडे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा