You are currently viewing मालवण तहसीलदार पदी वर्षा झालटे यांनी स्वीकारला पदभार

मालवण तहसीलदार पदी वर्षा झालटे यांनी स्वीकारला पदभार

मालवण :

 

मालवण तहसीलदार पदी वर्षा झालटे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. नायब तहसिलदार, अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

२००४-०५ या वर्षी सेवेत रुजू झालेल्या वर्षा झालटे यांनी कोकण विभाग रायगड येथून सेवेस सुरवात केली. त्यांनंतर शहापूर ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, करमणूक कर अधिकारी मुंबई उपनगर येथे त्या कार्यरत होत्या.

२०१३-१४ या वर्षी प्रमोशन होऊन त्या एमएमआरडीए व त्यानंतर भूमी संपादन पुनर्वसन पुनर्स्थापना नागपूर या ठिकाणी कार्यरत होत्या. नुकतीच त्यांची मालवण तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =