सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ३७ वा वर्धापनदिन….

सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेची वाटचाल प्रगतीच्या शिखराकडे…

♦सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील अग्रगण्य बँक. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून सतीश सावंत या शेतकरी पुत्राने कारभार सांभाळल्यावर शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना जिल्हा बँकेत सुरू झाल्या त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक म्हणून नावारूपास आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, लघु उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी जिल्हा बँकेकडे हक्काची बँक म्हणून आशेने पाहू लागले आहेत.

♦सतीश सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यापासून जिल्हा बँकेत आमूलाग्र बदल घडवून आणले. सीबीएस बँकिंग सुविधे अंतर्गत DBTL गॅस सबसिडी, प्रधानमंत्री जीवनज्योति विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ATM व्हॅन सुविधा, कॅश भरणा मशीन, POS/रेल्वे/IMPS/QR कोड असा कित्येक सुविधा त्यांच्या काळात सुरू झाल्या. अनेक कर्ज योजना जशा सिंधू घरकुल कर्ज, सिंधू पर्यटन निवास व न्याहारी कर्ज, सिंधू निवृत्ती वेतन कर्ज, सिंधू पगार तारण कर्ज, काथ्या उद्योग, धनवृद्धी शेळी पालन, दशावतार कलाकारांसाठी आगाऊ मानधन कर्ज योजना अशा अनेक कर्ज योजना सुरू केल्या.

♦सतीश सावंत यांच्या कार्यकाळात कित्येक ठेव योजनाही सुरू केलेल्या आहेत, त्यात मुदत ठेव, सुपर सेव्हिंग ठेव, दिशा दैनंदिन वैयक्तिक बचतगट योजना, पारिजात साप्ताहिक बचत ठेव, धनवर्धिनी, हरियाली, आवर्तक ठेव, सवर्ण ठेव अशा अनेक ठेव योजना सुद्धा यशस्वीपणे सुरू आहेत.

♦शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरणावर भर देऊन यांत्रिकी शेतीसाठी कर्ज, पीक कर्ज, बांबू लागवडीसाठी कर्ज, सिंचन व्यवस्थेसाठी, औजारे खरेदीसाठी, नाबार्डचे प्रकल्प, वासरू संगोपन, काजू प्रक्रिया, उन्नत्ती योजना, ब्रॉयलर व गावठी कुक्कुटपालन, इको फ्रेंडली गणेश मूर्तिकारांसाठी, उद्योग व्यवसाय, सोनेतारण, सौरऊर्जा, दिव्यांग व निराधार पेन्शन, स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी कर्ज योजना अशा अनेक कर्ज योजनासुद्धा सतीश सावंत यांच्या कार्यकाळात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना, उद्योग व्यावसायिकांना व गरजू व्यक्तींना त्याचा लाभ मिळाला आहे.

♦जिल्हा बँकेने सुरू केलेल्या अनेक योजनांमुळे आज कित्येकांना त्याचा लाभ घेता आला. जिल्हा बँकेच्या या प्रगतीत सिंहाचा वाटा उचललाय तो बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी. त्यांच्या अध्यक्षतेखाली बँकेने प्रगती केली आणि बँक यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. यश मिळवायचं असेल तर नेतृत्व कल्पक पाहिजे. आणि जिल्हा बँकेच्या जे यश मिळतं आहे ते सुद्धा सतीश सावंत यांच्यासारख्या कल्पक नेतृत्वामुळेच. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांची त्यांना जाण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजना ते कायम राबवित असतात.

♦जिल्हा बँक आज ३७ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. बँकेच्या या उत्तुंग यशात बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि मेहनती कर्मचारी यांची भक्कम साथ ही त्रिसूत्रीच खरी वाटेकरी आहे.
भविष्यातही बँकेने अशीच यशस्वी घोडदौड करत राहो याच संवाद मिडियाकडून शुभेच्छा…!

प्रतिक्रिया व्यक्त करा