विनाकारण फिरणाऱ्यांची बांद्यात रॅपिड टेस्ट; एक पॉझिटिव्ह

विनाकारण फिरणाऱ्यांची बांद्यात रॅपिड टेस्ट; एक पॉझिटिव्ह

बांदा

बांदा शहरात विनाकारण बाजारपेठेत फिरणार्‍यांची आज रॅपिड तपासणी करण्यात येत अाहे. दहाहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली असून एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोडामार्ग तालुक्यातील एका गावात सदर इसम प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
बांदा सरपंच अक्रम खान, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील घटनास्थळी ठाण मांडून आहेत. बाजारपेठेत येणार्‍यांची चौकशी करुनच सोडण्यात येत आहे. रॅपिड टेस्ट करण्यात येत असल्याने बाजारपेठेत नाहक येणार्‍यांची संख्या बर्‍यापैकी कमी झाली आहे. शहरात सध्या तुरळक नागरिक फिरताना दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा