You are currently viewing लॉकडाऊन

लॉकडाऊन

खरंच,

पोटालाही लॉक..

लावता आलं असतं,

तर लॉक डाऊन करणं..

सहज शक्य झालं असतं.

 

वितभर पोटासाठी,

दिवसभर राबायचं.

चार तोंडे खाणारी,

कसं सर्व सांभाळायचं.

 

तारेवरची कसरत असते,

गोरगरिबांच्या घरात.

दोन वेळच्या घासासाठी,

राबतात उन्हातान्हात.

 

कष्टाने कमावलेले थोडे,

पैसे असतात गाठीशी.

कामधंदे बंद झाल्यावर,

कसे राहतील कनवठिशी.

 

देवधर्म उपासतापास,

गरज नसतेच गरिबांना.

कित्येकदा घडतात उपास,

घरात अन्नधान्याविना.

 

लॉकडाऊन म्हणजे त्यांना,

उपासमारीचीच सजा.

गोरगरिबांनी उपासालाच,

मानावी का जीवनातील मजा.

 

खरंच,

पोटालाही लॉक..

लावता आलं असतं..तर…!!

 

(दिपी)✒️

दीपक पटेकर

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =