You are currently viewing पणदुरमध्ये संरक्षक भिंत कोसळली

पणदुरमध्ये संरक्षक भिंत कोसळली

तीन दुचाकी गाड्यांचे नुकसान; सरपंच दादा साईल यांनी केली पाहणी..

 

कुडाळ :

पणदुर येथे संरक्षक भिंत शेडवर कोसळल्यामुळे तीन गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडला. ही घटना पणदुर-सावंतवाडा येथे घडली. जर्नादन सावंत, गणपत राणे आणि गोपाळ सावंत असे नुकसान झालेल्या दुचाकीस्वारांचे नाव आहे. अंदाजे सत्तर ते ऐंशी हजाराचे नुकसान झाले आहे.

याबाबत आज सकाळी सरपंच दादा साईल, पोलीस पाटील देऊ सावंत, ग्रामपंचायत सदस्य आबा सावंत, सदस्य बबन पणदूरकर, माजी सरपंच श्यामसुंदर सावंत, रत्नदीप सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गावच्या तलाठी श्वेता दळवी तसेच कुडाळ तहसीलदार यांना याबाबतची माहिती देण्यात आली.

कुडाळ तालुक्यात मागील चार दिवस मुसळधार पाऊस होत असून काल रात्री पणदूर भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. गावात काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला आलेली मोठी झाडे सुद्धा कोसळली असून सरपंच दादा साईल यांनी ही झाडे कटिंग करून येथील मार्ग सुरळीत केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा