You are currently viewing केरळ मध्ये नैऋत्य मान्सून दाखल

केरळ मध्ये नैऋत्य मान्सून दाखल

सिंधुदुर्ग :

 

नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होते. यंदा मात्र यासाठी ८ तारीख उजाडावी लागली. तळकोकणात १६ जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान खात्यानं गुरूवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या ३ ते ४ दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा