महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या दारूचे 18 बॉक्स पकडले; दोघे ताब्यात

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या दारूचे 18 बॉक्स पकडले; दोघे ताब्यात

उजळाईवाडी (कोल्हापूर)

महामार्ग पोलिसांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या दारूचे अठरा बॉक्स वाहतूक करणारी गाडी पकडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की .

स. फौ. शंकर कोळी तात्यासाहेब मुंडे व त्यांचे सहकारी हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करीत असताना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर कागल दिशेकडून येणारी व पुण्याच्या दिशेने जाणारी एक सिल्व्हर रंगाची कार जिच्या काचा काळ्‍या रंगाच्या व बंद होत्या. कार चालकाल संशयावरून गाडी थांबविण्याचा इशारा केला परंतु चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना गाडीतील दोन जणांना शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले .

प्रतिक्रिया व्यक्त करा