You are currently viewing मेडिकल टुरिझम अभ्यासक्रम व यां शेत्रातील संधी विषयी होणाऱ्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनि भाग घ्यावा

मेडिकल टुरिझम अभ्यासक्रम व यां शेत्रातील संधी विषयी होणाऱ्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनि भाग घ्यावा

–  बाबा मोंडकर,अध्यक्ष. सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायीक महासंघ

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन दोन दशकापेक्षा जास्त काळ लोटून गेला पण जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी प्रयत्न झालेला नाही आज केरळ राज्य मसाज ,ऍक्युप्रेशर व मेडिकल टुरिझम शेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर आहे आपल्याही जिल्ह्याचा विचार करता उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यावरणाचा पूरक वापर करून जिल्ह्यात नैसर्गिक व मेडिकल टुरिझम मध्ये स्थानिक पर्यटन व नवोदित व्यावसायिक तसेच युवक युवतीसाठी बुधवार दिनांक२३ /६/२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता यासंबंधी माहितीचे बेबीनार आयोजित केला आहे. यांसाठी डॉ.रविंद्रजी मराठे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .डॉ. रविंद्रजी मराठे हे एम.डी.असून कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल आणि नानावटी हॉस्पिटल मध्ये संलग्न असून नेचरक्यूअर इन्स्टिट्यूट नाशिकशी 2007 पासून संलग्न असून यां संस्थे मार्फत चालू असलेल्या निसर्गउपचार शिक्षण अभ्यासक्रमाविषयी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल टुरिझम विषयी संधी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा व्हावा यांसाठी सिंधुदुर्ग व्यावसायिक महासंघाचा हा एक उपक्रम असून सर्वांनी
यां वेबीनार मध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती श्री बाबा मोंडकर, अध्यक्ष.सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =