You are currently viewing पॉलिटेक्निक प्रवेशाची वाढीव मुदत 21 जुलैपर्यंत

पॉलिटेक्निक प्रवेशाची वाढीव मुदत 21 जुलैपर्यंत

तंत्रशिक्षण विभागाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

सावंतवाडी

राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 21 जुलैपर्यंत वाढवली आहे._
_सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे – ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे 21 जुलै, प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे 21 जुलै, तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे 23 जुलै, तक्रार निवारण 23 ते 25 जुलै व अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे 26 जुलै._
_कॅपच्या विविध फेऱ्यांकरिता विकल्प अर्ज भरणे, जागावाटप, जागा स्वीकृती करणे, उमेदवाराने वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे, प्रवेशाची अंतिम तारीख इत्यादी बाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर घोषित केले जाईल आणि ते htttps://poly22.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल._
_यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी येथे तंत्रशिक्षण विभागाचे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र सुरूअसून इच्छुक विद्यार्थ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे. कॉलेजमध्ये एकूण पाच अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यांचे चॉईस कोड पुढीलप्रमाणे – सिव्हिल इंजिनिअरिंग (347019110), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (347061210), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (347029310), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (347024510), मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (347099710). यासोबतच आर्थिक दुर्बल (EWS) प्रवर्गासाठीचा अतिरिक्त कोटाही शासनातर्फे वाढविण्यात आला असून संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर EWS प्रमाणपत्रासह संस्थेमध्ये संपर्क साधावा._

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 11 =