You are currently viewing वेंगुर्लेत आंबा चोरीच्या रागातून मारहाण…

वेंगुर्लेत आंबा चोरीच्या रागातून मारहाण…

दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

वेंगुर्ले

आंबा चोरीच्या रागातून वेंगुर्लेतील तिघांना नग्न करून बेदम मारहाण केल्याचा कीळसवाणा प्रकार तालुक्यात घडला आहे. तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. ही घटना उभादांडा-वरचेमाडवाडी येथे नुकतीच घडली. दरम्यान याबाबत मारहाण झालेल्या गौतम वेंगुर्लेकर याने दिलेल्या तक्रारी नुसार प्रसाद मांजरेकर, प्रतिक धावडे, रावशा शेलार, गौरव मराठे, दिनेश गवळी, योगी सरमळकर याच्यासह दहा ते बारा जणांवर जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणे तसेच अश्लील चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित वेंगुर्ले येथून फरार झाले आहेत. मात्र आंबा चोरी प्रकरण हे निमित्त असून हा प्रकार अवैद्य दारू आणि गांजा विक्री प्रकरणातूनच घडला असल्याची जोरदार चर्चा वेंगुर्ले मध्ये सुरू आहे.

उभादांडा-वरचेमाडवाडी येथे ९ मे रोजी रात्रौ आंबा चोरी केल्याच्या संशयावरून ही मारहाणी केली, आणि नग्नावस्थे मधील मारहाणीचा व्हीडीओ करून तो व्हायरल केला. तो जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यापर्यत गेल्याने या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसांना चौकशी करून कारवाईच्या सुचना १० मे रोजी देण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनुसार वेंगुर्ले पोलीसांनी गौतम वेंगुर्लेकर याची तक्रार १२ मे रोजी घेतली. या तक्रारीत त्यांनी कोणतेही कारण नसताना आपणास नग्न करून मारहाण करीत मारहाणीचा व्हीडीओ काढला, सदरचा मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल केला बरोबरच जातीवाचक बोलून अपमान केल्याचे नमुद आहे. या तक्रारी वरून वेंगुर्ले पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी साळुंखे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + sixteen =