You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा १ डिसेंबरला सत्कार…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा १ डिसेंबरला सत्कार…

वेंगुर्ले भंडारी ऐक्यवर्धक मंडळाचे आयोजन; समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन…

वेंगुर्ले

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लाचे विद्यमान अध्यक्ष रमण वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी तर मंडळाचे विद्यमान सचिव विकास वैद्य यांची जिल्हा महासंघाच्या सचिवपदी तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून जयप्रकाश चमणकर यांची एकमताने निवड झाल्याबद्दल भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला व समाज बांधवांकडून वरील पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ बुधवार १ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील या तीन पदाधिकाऱ्यांची जिल्हा स्तरावर झालेली निवड भंडारी समाज बांधवांसाठी भूषणावह आहे. त्यामुळे साईमंगल कार्यालय वेंगुर्ला येथे हा सत्कार सोहळा माजी आमदार श्री. शंकर कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ साहित्यिका सौ.वृंदाताई कांबळी आणि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

‘कोविड १९’ चे शासनाचे सर्व नियम पाळून संपन्न होणाऱ्या या सत्कार सोहळ्यास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला चे उपाध्यक्ष अँड.शाम गोडकर व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 12 =