You are currently viewing सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर वाढदिवस अभिष्टचिंतन

सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर वाढदिवस अभिष्टचिंतन

सावंतवाडी नगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक बाबू कुडतरकर हे शांत संयमी, सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोकप्रतिनिधी. आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर ते सबनिसवाडा प्रभागातून निर्विवाद निवडून आले. बबन साळगावकरांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेकडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोण हा प्रश्न उभा राहिला, त्यावेळी शिवसेना नेतृत्वाच्या समोर जो पहिला चेहरा उभा राहिला तो “खेमराज उर्फ बाबू कुडतरकर” यांचाच. दीपक केसरकरांचाच शांत संयमी हा गुण अंगी भिनवून घेत त्यांच्याच मुशीत तयार झालेलं हे नेतृत्व.
बाबू कुडतरकर हे आक्रमक नेते नव्हेत, चेहऱ्यावर मंद स्मित ठेवत हसतमुखाने आपल्या कामात व्यस्त राहणारी व्यक्ती. घराची जबाबदारी लवकरच अंगावर पडल्याने घराबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव होत ते समाजकार्यकडे ओढले गेले. अडलेल्या नडलेल्यांची कामे जबाबदारीने करू लागले, त्यामुळे जनमानसात ते लोकप्रिय झाले. सावंतवाडीतील प्रथितयश वकील कै. सुभाष देसाई यांच्याकडे कायद्याचे बाळकडू घेतलेल्या बाबूला कायद्याची व प्रशासकीय कामांची उत्तम जाण आहे. नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत कमी वेळ मिळूनही त्यांनी बरीच बाजी मारली. परंतु अपक्ष उभे राहून काहींनी युतीमध्ये बनाव केल्याने अवघ्या अडीचशे मतांनी त्यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली, परंतु अल्प कालावधीत ते शहराच्या कानाकोपऱ्यात पोचले. त्यांच्या स्वभावामुळेच त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे.
दीपक केसरकर यांच्या नंतर काही नगराध्यक्ष होऊन गेले, परंतु केसरकरांसारखे तन मन धन अर्पून काम करण्याची ताकद केवळ खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्यात आहे. सावंतवाडीच्या या भावी नगराध्यक्षांचा आज वाढदिवस…! संवाद मिडियाकडून खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =