*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित भावस्पर्शी काव्यरचना*
*नाना — माणूसपणाचा कलाकार*
पडद्यावर यायचा तेव्हा
भूमिका जिवंत व्हायची
नजरेतल्या एका भावनेने
कहाणी मनात उतरायची…
संवाद त्याचा साधा होता,
पण काळजात घर करायचा
कधी हसवायचा, कधी रडवायचा
कधी अंतर्मनाला हादरून सोडायचा…
अभिनयाची उंची मोठी,
पण माणूस मात्र होता साधा,
यशाच्या शिखरावर असूनही
आपल्याच मनाचा दादा…
कधी सैनिक बनून लढला
कधी बाप बनून रडला,
कधी सामान्य माणसाच्या वेदनेत
स्वतःलाच त्यांनी शोधला…
त्यांच्या आवाजात आग होती,
आणि मनात मायेचा झरा,
म्हणूनच लाखो हृदयांना
नाना वाटतो आपला खरा…
कलाकार तर अनेक असतात,
पण माणूसपण जपणारे थोडे,
नानांच्या प्रत्येक भूमिकेत
दिसतात जीवनाचे कोडे…
पडदा खाली येतो तेव्हा
टाळ्यांचा गजर थांबतो,
पण नानांचा अभिनय नाही
तो मनामध्ये कायम राहतो!
नाना, आज तुम्ही नाहीत,
पण आठवणींचा दीप तेवत राहील,
डोळ्यांत अश्रू, ओठांवर तुमचं नाव,
आणि मन आयुष्यभर तुम्हाला हाक मारत राहील…
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
