*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार यांची वाढदिवस विशेष काव्यरचना*
*अरुणोदय*
रमणीय आजची पहाट
अरुणोदय सुंदर झाला
क्षितिजावरचा सूर्योदय
नवप्रेरणा घेऊन आला…🌹
साद घालत निसर्गाला
रंगफुलांची मुक्त उधळण
रिमझिम पाऊसथेंबासह
फुलपाखरांचे चाले नर्तन…🌷
भरती ओहोटी सुखदु:खांची
ईश्वरा साथ दिली उचित
गणगोत प्रेमळ मायेचं
लळा जिव्हाळा मिळे खचित..🌹
लेखणीत शब्द आधार
मिळता सुरेल साथ स्वरांची
विसरून जाते जगताला
मोहमयी आरास कलेची…🌷
शिरी थोरांचे आशीष
चुकले जर का कधी नकळत
मागते क्षमा सर्वांना
स्नेह लाभावा अविरत…🌹
सुखेनैवही ही नाव चालली
गाठायाचे पैलतिराला
शांतचित्त मी हे परमेशा
अर्थ मिळाला आयुष्याला…!!🌷
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*अरुणा दुद्दलवार@🌹✒️*
*वाढदिवस अभिष्टचिंतन ताई🎂🎂*
