You are currently viewing बांद्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी…

बांद्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी…

बांदा
आज सायंकाळी बांदा शहर व परिसराला विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. अवेळी पडलेल्या पावसाचा काजूवर मोठा परिणाम होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची एकच तारांबळ उडाली. तब्बल अर्धा तास पाऊस कोसळला. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसाचा परिणाम काजू पिकावर होणार आहे. ऐन काजू हंगामाच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + nineteen =