You are currently viewing फोंडाघाट हवेली नगरात भीषण आग; ७ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

फोंडाघाट हवेली नगरात भीषण आग; ७ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

फोंडाघाट हवेली नगरात भीषण आग; ७ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; अग्निशमन यंत्रणा उभारण्याची मागणी

फोंडाघाट :

हवेली नगर परिसरात लागलेल्या भीषण आगीत तब्बल ७ दुकाने जळून खाक झाली असून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भागात तातडीने अग्निशमन (फायर ब्रिगेड) यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या आगीत संतोष माळवडे यांच्या मालकीचे सर्व गाळे जळून गेले असून इतर व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तलाठी यांनी पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर करावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या दोन पुलांच्या कामामुळे संबंधित ए.पी. कॉन्ट्रॅक्टरकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अत्यावश्यक सेवा दुर्लक्षित होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

*संवाद मीडिया*

*🚗 करिअरची सुवर्णसंधी! 🚗*

*माई ह्युंदाई (Mai Hyundai)*

*27 वर्षांचा विश्वास • सततची प्रगती • उज्ज्वल भविष्य*

* माई ह्युंदाई (Mai Hyundai) तर्फे कुडाळ आणि कणकवली येथील शोरूमसाठी उत्साही आणि कुशल उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

*📌 उपलब्ध पदे:*

*▪️ सेल्स एक्झिक्युटिव्ह*
*▪️टीम लीडर*
*▪️सर्व्हिस ॲडव्हायझर*
*▪️CRM (सेल्स)*
*▪️CRM (सर्व्हिस) मॅनेजर*

*👉🎓 पात्रता:*

*पदवीधर / डिप्लोमा / पदवीधर उमेदवार*
*अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात*

*💼 सुविधा:👇*

*✔ प्रोव्हिडेंट फंड (PF)*
*✔ ग्रॅच्युटी*
*✔ वार्षिक बोनस*
*✔ मासिक इन्सेंटिव्ह*
*✔ ट्रॅव्हलिंग भत्ता*.

*📍 कामाचे ठिकाण:*

*Mai Hyundai*

*वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागडे, कणकवली*

*Mai Hyundai, उद्योगनगर, मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ*
*📅 अर्ज कसा कराल?👇*

*👉 इच्छुक उमेदवारांनी सविस्तर बायोडेटा व फोटोसह*
*🕙 सकाळी 10 ते 🕕 संध्याकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष भेट द्यावी*

*📞 संपर्क:*

*📱 74100 06037*

*📧 tmsnd@maihyundai.in*

*✨ 27 वर्षांचा विश्वास – Mai Hyundai सोबत उज्ज्वल करिअर घडवा! ✨*

*(नियम व अटी लागू)*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/202054/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा