You are currently viewing माडखोल धवडकी येथील ४० वर्षीय युवक बेपत्ता

माडखोल धवडकी येथील ४० वर्षीय युवक बेपत्ता

सावंतवाडी

माडखोल धवडकी येथील रहिवासी संतोष दिनकर मुरकर (४०) हे नाप ता असल्याबाबतची खबर त्यांची पत्नी पल्लवी मूरकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात नापताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष मुरकर हे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून मी मुंबईला जातो असे सांगून निघून गेले मात्र ते घरी परतले नाहीत. त्यांचा मोबाईल देखील सद्यस्थितीत बंद आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिली.

संतोष मूरकर हे केबल ऑपरेटर म्हणून काम करतात. त्या कामानिमित्त ते बाहेर जात असायचे. मात्र, आठ दिवसांच्या आत ते घरी परत यायचे. यावेळी २० दिवस उलटले तरीही अद्याप पर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने या बाबतची खबर पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती ठाणे अमलदार नाईक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + four =