You are currently viewing शिवजयंती निमित्त देवगड पंचायत समितीच्या वतीने निबंध व पोवाडा गायन स्पर्धा…

शिवजयंती निमित्त देवगड पंचायत समितीच्या वतीने निबंध व पोवाडा गायन स्पर्धा…

देवगड :

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी केली जाते. यावेळी शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पंचायत समिती देवगडच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये निबंध स्पर्धा आणि पोवाडा, आदिवासी शिवस्फूर्ती गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. covid-19 मुळे ही स्पर्धा केवळ पाचवी ते आठवी या वयोगटात घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाचनात शिवरायांचा इतिहास यावा यातून प्रेरणा घेऊन त्यांनी शिवचरित्र वाचावे. संस्कृती घेऊन देशप्रेम जागृत व्हावे मन मनगट आणि मेंदू केवळ आणि केवळ मातृभूमीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वापरले जावे. हा विचार त्यांच्या आचरणात यावेत यासाठी निबंध स्पर्धेसाठी शिवरायांचे बालपण, शिवरायांच्या एका किल्ल्याचे मनोगत असे विषय असून, पोवाडा किंवा शिवस्फूर्ती चे गीत यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले निबंध व पोवाडा किंवा स्फुर्तिगीते दिनांक 22/2/2019 रोजी शिक्षण विभाग पंचायत समिती देवगड येथे आणून द्यावेत. सदरचे स्पर्धा साहित्य संबंधित शाळेच्या शिक्षकांनी पंचायत समितीकडे आणून द्यावेत असे आवाहन सभापती रवी पालेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =