मुंबई विद्यापीठात अधिकारी,कर्मचाऱ्यांची ६६९ पदे रिक्त!

मुंबई विद्यापीठात अधिकारी,कर्मचाऱ्यांची ६६९ पदे रिक्त!

मुंबई

मुंबईविद्यापीठातील मागील काही दिवसपासून रिक्त पदे भरण्याची कोणतीही प्रक्रिया विद्यापीठ तसेच शासन स्तरावरून होत नसून, विद्यापीठातील आकृतीबंध पदांपैकी सुमारे ६६९ पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे.

तसेच विद्यापीठात विविध स्तरावरील १३१९ अशैक्षणिक पदांना मान्यता आहे. यापैकी सुमारे ४५५ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक लिपिक स्तरावरील सुमारे ४५ पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक कामे खोळंबत असल्याचा अनुभव कॉलेजांना येत आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा