You are currently viewing लोकवर्गणीतून निर्माण झालेल्या रुग्णवाहिकेचं दोडामार्गात होणार उद्या लोकार्पण

लोकवर्गणीतून निर्माण झालेल्या रुग्णवाहिकेचं दोडामार्गात होणार उद्या लोकार्पण

लोकवर्गणीतून निर्माण झालेल्या रुग्णवाहिकेचं दोडामार्गात होणार उद्या लोकार्पण

रुग्णसेवा फाऊंडेशन मार्फत सर्व सामान्यांना मिळणार रुग्णवाहिका सेवा

दोडामार्ग

लोकसहभाग आणि केवळ लोकवर्गणीतून प्रथमच दोडामार्गात आणण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे उद्या मंगळवारी 19 डिसेंबरला लोकार्पण केले जाणार आहे. येथील ग्रामीण रुगणालयाच्या ठिकाणी हा सोहळा होणार आहे. दोडामार्गातील सर्व क्षेत्रांमधील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त आर्थिक सहभागातून ही जनतेच्या पुढाकाराने हक्काची रुग्णवाहिका उद्यापासून सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध असणार आहे.

येथील रुग्णालयात कार्यरत असलेल्या अन्य रुग्णवाहिकांसोबत आणखी एक रुग्णवाहिका असावी व ही रुग्णवाहिका लोकवर्गणीतून आणलेली असावी अशी संकल्पना दोडामार्ग वसियांचे सेवेत अहोरात्र झटणारे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे मांडली होती. त्या संकल्पनेला दोडामार्ग तालुक्यातील लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उद्योजक, वकील, पत्रकार, शिक्षक, बांधकाम व्यावसायिक नव्हे तर अगदी सर्वसामान्य जनानी त्या ‘दिवशी एका तासात सात लाखाहून अधिक लोकवर्गणी जाहीर केली होती. तसेच त्यानंतर उर्वरित रक्कम ही गोळा होऊ लागली. आणि लोकवर्गणीतून हक्काची रुग्णवाहिका ही संकल्पना सत्यात उतरली आहे. नवी कोरी रुग्णवाहिका दोडामार्ग येथे उपलब्ध झाली असून तिचे आरटीओ पासिंग झालेनंतर ही रुग्णवाहिका आता तमाम दोडामार्गवासियांच्या सेवेत रुजू होणार आहे. दोडामार्ग रुग्णसेवा फाऊंडेशन ट्रस्ट च्या माध्यमातुन पुढील प्रक्रिया हाताळण्यात येणार आहे.

या रुग्णवाहिकेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी सकाळी 11.30 वाजता ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला रुग्णवाहीकेसाठी प्रत्यक्ष हातभार लावणाऱ्यांसोबत दोडामार्गातील सर्व नागरिक, विविध संघटनाचे पदाधिकारी, लोकप्रतीनिधी आदी उपस्थित राहणार आहेत.

आपली उपस्थिती प्रार्थनीय…
लोकसभा आणि लोकवर्गणीतून रुग्णवाहिका… त्यासाठी जवळपास आठ ते दहा लाखांचा खर्च.. सारे काही अग्निदिव्य होत. मात्र या मोठ्या रकमेला आणि लोकांना अत्यंत आवश्यक असलेल्या रुग्णवाहिका संकल्पनेला समाजातील सर्व स्तरातील अगदी उद्योजक ते कॉमन मॅन या साऱ्यांनी हातभार लावला आणि एवढा मोठा निधी म्हणता म्हणता उभा राहिला. त्यामुळे अखेर हे स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे ही सेवा उपलब्ध करून देण्याऱ्या प्रत्येक नागरिकाने आणि ती अखंडित सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांनीच सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी या लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन दोडामार्ग वासियांनी केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =