You are currently viewing जिल्ह्यात 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस
मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये-निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

जिल्ह्यात 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस

मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये-निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे…

देशिक हवामान मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 18 ते 21 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.दक्षिण महाराष्ट्र- गोवा समुद्र किनाऱ्यावर दिनांक 18 व 21ऑगस्ट रोजी 45 ते 55 कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. तरी या कालावधीत मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली

तरी संबंधितांनी याबाबत पूर्व नियोजन करण्यात यावे तालुक्यातील शोध व बचावगट, सेवाभावी संस्था, तालुक्यातील पट्टीचे पोहणारे यांच्या संपर्कात रहावे. पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने सखल भागात व दरडप्रवण भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + seventeen =