You are currently viewing शिरोडा-वेळागर येथे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे आ. केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

शिरोडा-वेळागर येथे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे आ. केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

वेंगुर्ले

टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने व शिरोडा वेळागर सर्वे. नं. 39 मित्रमंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्ग ने येथे राष्ट्रीयस्तरावरील रस्सीखेच स्पर्धा शिरोडा सारख्या ग्रामीण भागात आयोजित केली हे कौतुस्कास्पद आहे. नजिकच्या काळात रस्सीखेच स्पर्धा जिल्हयातला अग्रेसर खेळ म्हणून नावारुपाला येईल असे प्रतिपादन आमदार दिपक केसरकर यांनी केले.शिरोडा वेळागर बीचवर आयोजित करण्यात आलेल्या 35 व्या सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बीच रस्सीखेच चॅिम्पयनशिप 2022 स्पर्धेचे उदघाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले.

यावेळी व्यापिठावर उपस्थितीत जिल्हा रस्सीखेच सघटनेचे अध्यक्ष तथा वेळागर सर्व्हे नं. 39 चे नेते जयप्रकाश चमणकर, राष्ट्रीय रस्सीखेच संघटनेचे सचिव मदन मोहन, महाराट्र राज्य रस्सीखेच्या अध्यक्षा व आशियाई रस्सीखेच्या सचिव माधवीताई पाटील, राज्य सचिव गुपीले, स्पर्धा समितीचे प्रमुख उदय भगत, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांत सुधीर भगत, समिर भगत, आग्नेल सोज, फ्रान्सीस फर्नांडिस, आजू आमरे, अब्रास मेनन, रुपेश तारी, श्याम भगत, नेल्सन सोज, पास्कॉल फर्नांडिस, प्रा. संजय खडपकर, निलेश चमणकर, अँड. सौ श्वेता पिळणकर-चमणकर, कृषि राष्ट्रीय पदक विजेते दादा मावळणकर, त्रिंबक आजगांवकर, माजी सरपंच विजय पडवळ, दिपक पडवळ, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, शहर शिवसेना प्रमुख अजित राऊळ, कौशिक परब, जगvनाथ डोंगरे आदी उपस्थित होते.आमदार दिपक केसरकर यांनी शुभेच्छा देताना या स्पर्धेचे नियोजन अत्यंत कमी वेळेत चांगल्या प्रकारे केल्याबद्दल रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, सचिव किशोर सोनसुरकर, वेळागर सर्वे नं. 39 मित्रमंडळ व शिरोडा ग्रामवासियांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =