You are currently viewing वैभववाडी- ऐनारी गुरववाडी येथील उबाठा युवासेनेचे उप विभाग प्रमुख रुपेश गुरव यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

वैभववाडी- ऐनारी गुरववाडी येथील उबाठा युवासेनेचे उप विभाग प्रमुख रुपेश गुरव यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

*वैभववाडी- ऐनारी गुरववाडी येथील उबाठा युवासेनेचे उप विभाग प्रमुख रुपेश गुरव यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश*

*उ.भा.ठा. पदाधिकाऱ्यांचे भाजपा त पक्षप्रवेश सुरूच

*एकापाठोपाठ एक धक्के सुरूच*

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गुरववाडी येथील उ. बा. ठा.पक्षाचे युवक उपविभाग प्रमुख रुपेश कांतीलाल गुरव यांनी आपल्या असंख्य शिवसैनिकांसमवेत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उबाठा सेनेला आमदार नितेश राणे यांनी फार मोठा धक्का दिला आहे. रत्नागिरी येथे आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सुरू असतानाच वैभववाडी येथे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गुरववाडी येथील उभाठा पक्षाचे कार्यकर्ते रुपेश गुरव, विशाल गुरव, अविनाश लोखंडे, नंदकिशोर गुरव, अमित गुरव, प्रसाद गुरव, ज्ञानेश्वर सकपाळ,हर्षल सुतार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून कोणतीच विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन. भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ऐनारी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ लागला आहे. याचा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन रुपेश गुरव व कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.
यावेळी आमदार नितेश राणे, यांच्या समवेत तालुका अध्यक्ष नासिर काझी, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, देवानंद पालांडे,आदि भाजप उपस्थित होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा