You are currently viewing जिल्ह्यातील मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

जिल्ह्यातील मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

जिल्ह्यातील मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात राजीनामा अस्त्र मोठ्या प्रमाणात सुरू असून संघटनेत उभी फूट पडलेली दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या प्रथम दिनीच त्याची सुरुवात मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सावंतवाडी येथील माजी विद्यार्थी सेनाध्यक्ष आशिष सुभेदार, मालवण माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव व दोडामार्ग सुनील गवस यांच्या तडकाफडकी राजीनामा नाट्यापासून झाली आहे. मागील दोन दिवसांत सावंतवाडी,वेंगुर्ले व कुडाळ येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ताजे असतानाच आज कुडाळ,मालवण व कणकवली येथील विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले प्राथमिक सदस्य पदाचे राजीनामे पक्षाचे अध्यक्ष राजठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे सोपवले आहेत. यामध्ये कुडाळ विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष तथा सोशल मीडिया प्रमुख गुरु मर्गज, माजी उपजिल्हाध्यक्ष प्रतीक कुबल व हितेंद्र काळसेकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कणकवली धनराज गोरे आदींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 2 =