You are currently viewing स्वातंत्र्य सेनानी मधु लिमये यांचा महाराष्ट्रभर येत्या १ मे पासुन ‘जन्मशताब्दी वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार..

स्वातंत्र्य सेनानी मधु लिमये यांचा महाराष्ट्रभर येत्या १ मे पासुन ‘जन्मशताब्दी वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार..

मा.खास.भालचंद्र मुणगेकर यांची माहिती

तळेरे

समाजवादी चळवळीतील अग्रणी असामान्य संसदपट्टू आणि स्वातंत्र्य आंदोलनातील बिनीचे शिलेदार मधु लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष १ मे २०२१ रोजी सुरू होत आहे. त्यांच्या कार्याची उचित दखल घेणे आणि त्यांची स्मृती सतत तेवत ठेवण्याच्या हेतूने येत्या वर्षभरात महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा, व्याख्याने आणि परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत.अशाप्रकारे विविध कार्यक्रम करण्यासाठी मधू लिमये जन्मशताब्दी संयोजन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर या समितीचे अध्यक्ष असून अमरेंद्र धनेश्वर आणि संजीव साने हे निमंत्रित आहेत. या समितीतर्फे शनिवारी १ मे २०२१ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता प्रख्यात विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रताप भानु मेहता यांचे ‘चॅलेंजेस बिफोर इंडियन डेमोक्रोसी ए हिस्टाॅरिकल परस्पोक्टिव्ह’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. हिंदीतून होणारे हे व्याख्यान ऐकण्यासाठी
लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी बहुसंख्येने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन मधु लिमये जन्मशताब्दी संयोजन समितीतर्फे श्री.संजय वेतुरेकर (मोबाईल नं-9834049289) आणि ॲड.संदिप निंबाळकर (9423633949) यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =