You are currently viewing आचरेकर प्रतिष्ठान येथे 12 रोजी मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणी जागवणार

आचरेकर प्रतिष्ठान येथे 12 रोजी मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणी जागवणार

आचरेकर प्रतिष्ठान येथे 12 रोजी मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणी जागवणार

कणकवली

नाटककार, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे निमित्ताने वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने त्यांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आणि त्यांचे स्नेही श्री रविप्रकाश कुलकर्णी यांचे कालेलकर – लेखक आणि माणूस’ या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. एक तासाचे हे व्याख्यान वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रंगमंदिरात मंगळवार 12 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता संपन्न होणार आहे.

कोकणातल्या या बहुयामी कलाकाराच्या आठवणी जागवण्यासाठी कणकवलीतील नाट्यप्रेमी व रसिका प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ऍड.एन. आर.देसाई यांनी केले आहे.
नाटककार, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार मधुसूदन कालेलकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. वेंगुर्ल्यात जन्मलेल्या कालेलकर यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर मराठी नाट्य, चित्रपटसृष्टीत प्रस्थापित होताना हिंदी चित्रपटसृष्टीतही मानाचे स्थान मिळवले. कालेलकर नाट्यनिर्मातेही होते.
अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात्र, दिल्या घरी तू सुखी रहा ही त्यांची काही गाजलेली नाटके. झुमरू, ब्लफ मास्टर, गीत गाता चल अशा काही रौप्यमहोत्सवी हिंदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या. ‘चांदणे शिंपीत जाशी…’ आणि अंगाईगीताचा दर्जा प्राप्त केलेले ‘ निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई… ही गीते कालेलकरांच्या प्रासादिक लेखणीतून अवतरली आहेत.
महाराष्ट्र शासनाची नऊ पारितोषिके मिळवणारे कालेलकर फिल्मफेअर पारितोषिक तसेच ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले गेले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा