You are currently viewing अन्यायकारक करवाढ मागे घेतल्याविना हटणार नाही!

अन्यायकारक करवाढ मागे घेतल्याविना हटणार नाही!

सावंतवाडीत एल्गार परिषदेत निर्धार : उद्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन: अन्यथा आंदोलन उभारणार!

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषदेने घरपट्टी पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. नगरपरिषदेला घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढ मागे घ्यावी लागेल, त्यासाठी शहरात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा रविवारी केशवसुत कट्ट्यावर झालेल्या सर्वपक्षीय एल्गार परिषदेत देण्यात आला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस वंचित आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. मात्र, शिवसेना शिंदे गट उपस्थित नव्हता. या एल्गार परिषदेत घरपट्टी व पाणीपट्टी वाढीचा जोरदार निषेध करण्यात आला. तसेच ७ मार्चला घरपट्टी, पाणीपट्टी दरवाढ मागे घेण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले तर ९ मार्चला चौका- चौकात घंटानाद आंदोलन करण्याचे ठरले. शिमगोत्सवानंतर जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

या बैठकीला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. दिलीप नार्वेकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, जस्मिन लक्ष्मेश्वर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. गटाचे तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ, प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर ज्येष्ठ नेते बाळा गावडे, मनसेचे राजू कासकर आशिष सुभेदार, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, संजय पेडणेकर, वंचित आघाडीचे महेश परुळेकर, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, बाळ बोर्डेकर, रामदास जाधव, केदार म्हसकर, अफरोज राजगुरू राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्षा सायली दुभाषी, अफरोज राजगुरू, नरेंद्र गवंडे, भाजपच्या मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा